मोदींमुळे लोकशाहीला धोका – मनमोहन सिंग

मनमोहन सिंग यांचा केंद्र सरकारवर चौफेर हल्ला

नवी दिल्ली – मोदी सरकार सातत्याने घटनात्मक संस्थांना सुरूंग लावत आहे. देशातील लोकशाही मोदी सरकारमुळे धोक्‍यात आली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे. कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहकार्य करण्याचे आवाहनही मनमोहन सिंग यांनी केले आहे. सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या सर्वच आश्‍वासनांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. आता या सरकारने देशातील जनतेला या कामांचा हिशोब देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. रोजगाराच्या संधी नष्ट झाल्या आहेत. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय वाईट असून अल्पसंख्यांक, दलित आणि महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. मात्र मोदी सरकारला त्याची चिंता नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात गेल्या चार वर्षात समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये राग निर्माण झाला आहे, असे सिंग म्हणाले.

मोदी सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, ते पाहता देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात संसदेमध्ये जे काही झाले, ते लोकांच्या डोळ्यासमोर आहे, असे रामलीला मैदानावर झालेल्या “जनआक्रोश रॅली’मध्ये बोलताना सिंग म्हणाले.

मोदी सरकारने संसदेमध्ये अविश्‍वास ठराव फेटाळला. अविश्‍वास ठराव संसदेमध्ये मांडण्यापासून रोखण्यासाठी या सरकारने शक्‍य असेल, ते सर्वकाही केले. संसद योग्यरितीने काम करू शकत नाही. हाच लोकशाहीला धोका आहे. संसदेला काम करू न देताच अर्थसंकल्प मंजूर केला गेला. राज्यघटनेने प्रदान केलेली लोकशाही जपणे आणि सक्षम करणे आपले काम आहे. आज घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन केले जात आहे.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेले आहेत. अशा प्रकरणांमुळे देशातील बॅंकांचे स्वास्थावर परिणाम होत आहे. जगभरात क्रूड तेलाच्या किंमती घसरत असताना भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. या किंमतींवर सरकार नियंत्रण का आणत नाही, असा सवालही मनमोहन सिंग यांनी उपस्थित केला.असेही मनमोहन सिंग म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)