मोदींनी सांगितलं फिटनेसचं ‘रहस्य’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितले आहे. लंडनच्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमामध्ये मोदींना  फिटनेसबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले कि, मागच्या २० वर्षापासून मी दररोज एक ते दोन किलो शिव्या खात आहे तेच माझ्या ऊर्जेमागचे खरे रहस्य आहे.

माझ्यावर प्रचंड टीका होते तेच माझ्या फिटनेसचे खरे रहस्य आहे असे मोदी म्हणाले. लंडनच्या वेस्टमिनिस्टर सेंट्रल हॉलमध्ये जवळपास दोन तास हा कार्यक्रम सुरु होता. प्रश्न-उत्तर असे स्वरुप असलेल्या या कार्यक्रमात सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी जनतेच्यावतीने मोदींना प्रश्न विचारले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)