मोदींनी संसद, सीबीआय अशा संस्थांचे पद्‌तशीर खच्चीकरण केले : मनमोहन सिंग

इंदोर: पंतप्रधान मोदींच्या काळात संसद, सीबीआय अशा महत्वाच्या घटनात्मक संस्थांचे पद्धतशीर खच्चीकरण आणि अवमुल्यन केले जात आहे. देशातील लोकशाहीही कमकुवत करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे.

मध्यप्रदेशातील निवडणूक प्रचारानिमीत्त त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले की या सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. कायद्याचे राज्य ही संकल्पनाच आता नष्ट होताना दिसत आहे. ही स्थिती बदलली नाहीं तर या पिढीला इतिहास क्षमा करणार नाही असे ते म्हणाले.सध्या आरबीआय आणि अर्थमंत्रालयातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. या दोन्ही महत्वाच्या संस्थांमध्ये सलोखा आणि समन्वय असायला हवा तो सध्या दिसत नाही. अर्थमंत्री आणि आरबीआय गव्हर्नर यांच्यातील नाते नाजूक असते. त्यांनी एकमेकांना समजून घेत काम केले पाहिजे.

मोदींची विरोधकांविषयीची भाषा पदला शोभणारी नाही 
यावेळी बोलताना मनमोहनसिंग म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विरोधकांवर ज्या भाषेत टीका करताना दिसतात ती भाषा पंतप्रधानपदाला शोभणारी नाही. विरोधकांना उद्देशून ते काही असंसदीय शब्दही वापरत आहेत. तेही त्यांना शोभनीय दिसत नाही. कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची शक्‍यता कितपत आहे असे, विचारता ते म्हणाले की सन 2014 पासून पक्षाला मोठ्या आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागला आहे. आमच्या राजकीय विरोधकांनी प्रसार माध्यमांची आणि लोकांची मोठ्या प्रमाणावर दिशाभुल केली. त्यांनी तथाकथीत भ्रष्टाचार प्रकरणांचा मोठा बभ्रा केला. पण त्यावरील आम्ही आमची भूमिका लोकांपर्यंत पोहचवू शकलो नाही असे ते म्हणाले. आपले सरकार रिमोट कंट्रोलवर चाललेले सरकार नव्हते असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. आमच्यावेळी सरकार आणि पक्ष मिळूनमिसळून काम करीत होते. युपीए सरकारने मध्यप्रदेशला सापत्नभावाची वागणूक दिली होंती या आरोपाचाहीं त्यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी याविषयी सबळ दाखले द्यावेत. 

कायद्याने देश चालवण्याची जबाबदारी सरकारला दिली असली तरी काही बाबतीत आरबीआयलाही अधिकार देण्यात आले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पण या दोन्ही मध्ये आता सलोखा निर्माण केला जात आहे त्याबद्दल आपण समाधानी आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. नोटबंदीने देशात कोणतेच उद्दीष्ठ साध्य झालेले नाही असे नमूद करून ते म्हणाले की मोदी सरकारने आणलेल्या जीएसटीमुळे असंघटीत क्षेत्रात अपरिमीत हानी झाली आहे. राफेल प्रकरणाविषयी विचारले असता ते म्हणाले की या आरोपाची जेपीसी नेमून चौकशी करावी अशी मागणी होत असताना ती मागणी सरकार मान्य करीत नाही त्यामुळेच त्यात निश्‍चीत काही तरी पाणी मुरते आहे असे स्पष्ट होते आहे. मोदी सरकारचा मेक ईन इंडिया हा कार्यक्रम सुद्धा एक जुमला सिद्ध झाला आहे असा आरोपी त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)