मोदींनी राज्यसभेत केलेली टिप्पणी कामकाजातून हटवली

नवी दिल्ली – राज्यसभेचे अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केलेली एक टिप्पणी कामकाजातून हटवली. टिप्पणी आक्षेपार्ह ठरण्याच्या शक्‍यतेने नायडू यांनी ते पाऊल उचलले. पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य कामकाजातून वगळले जाण्याची बाब दुर्मिळ मानली जाते.

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी गुरूवारी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत सत्तारूढ एनडीएचे उमेदवार हरिवंशनारायण सिंह विजयी झाले. त्यानंतर त्यांचे सभागृहात इतर सदस्यांनी अभिनंदन केले. त्यावेळी मोदींनी विरोधकांचे उमेदवार बी.के.हरिप्रसाद यांच्या संदर्भात एक टिप्पणी केली. त्या टिप्पणीवर आक्षेप घेत काही विरोधी सदस्यांनी ती कामकाजातून वगळण्याची मागणी केली.

-Ads-

हरिप्रसाद यांनीही मोदींनी सभागृहाची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप केला. त्यानंतर नायडू यांनी मोदींची टिप्पणी आक्षेपार्ह आहे का हे तपासण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आज नायडू यांनी मोदी यांची टिप्पणी कामकाजातून हटवली. हरिवंश यांच्या अभिनंदन प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वापरलेला एक शब्दही नायडूंनी कामकाजातून वगळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)