मोदींनी महिला अत्याचारांची गंभीर दाखल घ्यावी- आयएमएफ प्रमुख

वॉशिंग्टन : कठुआतील घटना बीभत्स असून पंतप्रधान मोदींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी व्यक्त केली.

जम्मू-काश्मीरच्या कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरलेली असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनांची दखल घेतली जात आहे.

-Ads-

लगार्ड म्हणाल्या, भारतात जे घडलं ते खरंच बीभत्स होतं. मला आशा आहे की भारतातील प्रशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व घटनांकडे गांभीर्याने बघतील. भारतातील महिलांना सुरक्षेची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. हे माझे व्यक्तिगत मत आहे. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)