मोदींनी जलपूजन केले असताना शिवस्मारकाचा ‘शुभारंभ’ कशासाठी? : अजित पवार

File Photo

काल राज्यशासना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवस्मारक शुभारंभ कार्यक्रमावरून राज्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘एकीकडे शिवस्मारकाच्या निविदांवर आक्षेप नोंदवायचा आणि दुसरीकडे शुभारंभाचा कार्यक्रम घ्यायचा’ अशी परखड टीका काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यशासनाला ‘शिवस्मारक शुभारंभ कार्यक्रमावरून’ खडे बोल सुनावले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाचे जलपूजन केलेले असताना थेट काम सुरु करण्याऐवजी पुन्हा तिथे जाण्याचं कारणच काय?” “शिवस्मारकाचा दुसऱ्यांदा शुभारंभ करून कोणाला आपले महत्व वाढवून घ्यायचे होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारळ फोडल्याचे कोणाच्या डोळ्यात खुपले?” असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अजित पवार यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी प्रकरणावरून देखील सरकारला धारेवर धरत कर्जमाफी जाहीर करून १४ महिने उलटले तरी अजूनही फायनल यादी का तयार झाली नाही? आपण सरकारला मदत करायला तयार आहोत मात्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची तत्परता दाखवायला हवी असं देखील ते म्हणाले.

https://twitter.com/NCPspeaks/status/1055424434998104065

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)