मोदींना सेऊल शांतता पुरस्कार 

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक अर्थकारणाला चालना देण्याची भूमिका घेतल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. या पुरस्काराबद्दल मोदींनी कोरियाचे आभार मानले असून त्यांनी त्यांची कृतज्ञताही व्यक्त केली आहे.
परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी या संबंधात आपल्या ट्‌विटर अकौंटवर म्हटले आहे की आपल्या आर्थिक धोरणांनुसार मानवी विकास आणि भारतातील लोकशाहीला प्रोत्साहन देण्याच्या मोदींच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावरून मिळालेली ही एक मोठी दाद आहे.
सन 1990 सालापासून सेऊल शांतता पुरस्कार दिला जातो. सेऊल मध्ये त्या वर्षी 24 वी ऑलिम्पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वर्षापासून दक्षिण कोरिया सरकारने हा पुरस्कार सुरू केला आहे. भारतात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचाही या निमीत्ताने कोरियाने गौरव केला आहे असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
मोदींनी जगातील विविध देशांचा दौरा करून जागतिक शांतता आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना दिल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या आधी हा पुरस्कार संयुक्तराष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान, जर्मन चॅन्सलर अँजेला मार्केल इत्यादींना मिळाला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)