मोदींना धडा शिकवु – द्रमुक प्रमुख स्टॅलिन

चेन्नाई – एम. के स्टॅलिन यांनी द्रमुक पक्षाचे प्रमुख म्हणून अधिकृतपणे सूत्रे हाती घेतली. त्यांचे वडिल करूणानिधी यांच्याकडे आत्तापर्यंत हे पद होते व स्टॅलिन हे पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण त्यांनी पक्षाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात मोदींना धडा शिकवण्याची भाषा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रत्येक बाबीला धार्मिक रंग देण्याचे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही देशाची सेक्‍युलर चौकट मोडीत काढणाऱ्या मोदी सरकारला आम्ही धडा शिकवू.

पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील भ्रष्ट सरकारवरही ताशेरे मारले. राज्यातील हे भ्रष्ट सरकार उखडून फेकण्याचा निर्धार करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की आपल्या वडिलांनी सांभाळलेले हे पद मला स्वीकारावे लागले आहे ही एक मोठी जबाबदारी आहे. मला एकट्याने ती पेलणार नाही तुम्ही सर्वांनीच मला यासाठी साथ दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आपल्याकडून चूक झाली तर आपल्याला सवाल करण्याचा तुम्हा सर्वांना अधिकार आहे असेही त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी सरकारच्या कारभारावर टीका करताना ते म्हणाले की या सरकारने देशातील सर्वच संस्थांवर हल्ले करून त्यांचे अधिकार मर्यादित केले आहेत. शिक्षण, कला अशा सर्व क्षेत्रांना धार्मिंक रंग देण्याचे काम सुरू असून त्यातून देशाची सेक्‍युलर चौकट मोडीत काढण्यात आली आहे. त्यासाठी मोदींना धडा शिकवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)