मोदींना जनतेच्या हिताची पर्वा नाही : काँग्रेस 

संग्रहित छायाचित्र
पांडुचेरी: काँग्रेसचे जेष्ठनेते मुकुल वासनिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. भाजपा सरकारवर राफेल विमान खरेदी प्रकरणात ‘भ्रष्टाचार’ झाल्याच्या ठपका ठेवत काँग्रेस पक्षाकडून एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुकुल वासनिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला “राफेल या लढाऊ विमान खरेदीमध्ये मोठा अपहार झाला आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोट्याळ्याची चौकशी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे करण्यात यावी” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेच्या हिताची किंचितही पर्वा नसून, त्यांना केवळ सत्ता व आरएसएसचे हित जोपासण्यात रस आहे. मोदी यांच्या अशा वागण्यामुळे देशाचे आतोनात नुकसान होत आहे” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)