मोदींच्या भाषणांना काहीच अर्थ नसतो – राहुल गांधी 

विदीशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून जी भाषणे करतात त्यात काहीच अर्थ नसतो हे भारतातील लोकांनाही कळून चुकले आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रचार सभांमधून त्यांनी जी जाहीर आश्‍वासने दिली होंती त्यावर त्यांनी आता बोलले पाहिजे अशा शब्दात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकासाठी मध्यप्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी आज येथे प्रचार सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.

आपण पुर्वी दिलेल्या आश्‍वासनांवर आपल्या सरकारने नेमक्‍या काय उपाययोजना केल्या त्याची माहिती मोदी कधीच देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाषणात काही दम वाटत नाही असे ते म्हणाले. मोदींनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, बोनस, कृषी मालाला दुप्पट किंमत अशी आश्‍वासने दिली होती त्याची त्यांनी उत्तरे आता दिली पाहिजेत. ते म्हणाले की कॉंग्रेसचे सरकार या राज्यात आले की आमचा मुख्यमंत्री 18 तास काम करील आणि लोकांना रोजगार पुरवण्याची व्यवस्था करेल. अशी ग्वाही त्यांनी दिली.

आज निवडणुका असलेल्या सर्वच राज्यात बेरोजगारी आणि शेतीच्या समस्या मोठ्या आहेत. आज चीन दररोज 50 हजार युवकांना रोजगार देतो पण भारतात हे प्रमाण दिवसाला केवळ 450 इतकेच आहे हे सरकारनेच संसदेत कबुल केले आहे असे राहुल गांधी यांनी नमूद केले. मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने व्यापमचा घोटाळा करून राज्यातील शिक्षण व्यवस्थेचेही वाट लावली आहे असा आरोपही त्यांनी केला.

————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)