मोदींच्या फोटोबरोबरच इंधनाचे भडकलेले दरही पंपावर लावा

शिवसेनेचा मोदींवर निशाणा
मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या नव्याने झालेल्या दरवाढीवरून शिवसेनेने मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. अलिकडेच मोदी सरकारकडून सर्व पेट्रोल पंप चालकांना मोदींचा फोटो लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा फोटो लावतानाच त्याच्या बरोबरीने त्यांच्या काळातील इंधनाच्या वाढलेल्या दरांचीही आकडेवारी तेथे लावा अशी उपरोधिक सुचना शिवसेनेन आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात केली आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की इंधनाच्या वाढत्या दराला आळा घालण्यास या सरकारला साफ अपयश आले आहे. इंधनाचे दर आकाशाला भिडल्यानंतर काहीं काळ सरकारने हस्तक्षेप केला होता पण लोकांना दिलेला हा दिलासा तात्पुरताच ठरला आणि आता पुन्हा इंधनाची दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीत आणा म्हणजे त्याचे दर आपोआप खाली येतील अशी मागणी होत असताना सरकारने त्यास नकार दिल्याने इंधनाचे दर कमी होणे ही बाब लोकांसाठी केवळ एक स्वप्नच ठरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांना अच्छे दिनाची स्वप्ने मोदींनी दाखवली पण गेल्या चार वर्षात त्यासाठी मोदींनी काय केले असा सवालही या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. लोकांच्या जीवनात स्थैर्य आणण्यात मोदींना अपयश आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आता अच्छे दिन विसरा पण लोकांना किमान स्थीरता तरी द्या अशी सूचना शिवसेनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)