मोदींच्या पाठराखणीमुळे कारवाईला सरकारची टाळाटाळ

भिडेंवर आठ दिवसांत कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करणार


ऍड. प्रकाश आंबेडकरांचा इशारा

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंवर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भिडेंची पाठराखण करीत असल्याने राज्य सरकार त्यांच्यावर कारवाईची टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोप संभाजी भिडेंवर आहे. त्यांच्या अटकेसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि इतर संघटनांनी सोमवारी मुंबईत एल्गार मोर्चा काढला होता. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर फोर्ट येथील आझाद मैदानावर राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. या आंदोलकांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांना शिष्टमंडळासह चर्चेसाठी आमंत्रण दिले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. संभाजी भिडेंना गुरू मानणाऱ्या त्यांच्या संघटनेतील रावसाहेब पाटील नामक एका व्यक्तीने समाजमाध्यमांवर भीमा कोरेगाव घटनेसंबंधी गंभीर मजकूर लिहिला आहे. “भीमा कोरेगाव येथे आम्हाला अपेक्षीत असलेला मृतांचा आकडा आपण गाठू शकलो नाही’ अशा आशयाचा हा मजकूर असून मुख्यमंत्र्यांनाही मारायला हवे, असे चिथावणीखोर वक्तव्यही या रावसाहेब पाटील यांनी फेसबूकद्वारे केल्याची बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली, असे आंबेडकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)