मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यात बदल, लंडनहून जर्मनीला जाणार

लंडन : ब्रिटेनच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दौऱ्यात बदल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीकडे रवाना झाले आहेत. मोदी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेणार आहेत. या दौ-यात मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान खाकान अब्बासी यांची भेट न घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रमंडळ देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांची भेट घेण्याचे टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोगममधल्या राष्ट्रमंडळ देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत सहभाग घेण्यासाठी चार दिवसांच्या ब्रिटेनच्या दौ-यावर गेले होते.

-Ads-

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी गेल्या वेळी डिसेंबर २०१५मध्ये भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तान दौ-यावरून परतताना लाहोरला अचानक जाऊन पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतल्यानं तो चर्चेचा विषय ठरला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)