मोदींच्या नामोहरमासाठी कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही- अरुण शौरी

नवी दिल्ली:  देशात एकीकडे केंद्रातील मोदी सरकारचा पायउतार करण्यसाठी सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे भाजपला त्यांच्याच नेत्याकडून सरकारला घरचा आहेर मिळताना दिसत आहे. कारण, ‘१९७७ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची संपूर्ण देशात लाट असताना तेव्हा त्यांना हरवण्यासाठी कोणताच चेहरा नव्हता. लोकांनीच त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही,’ असे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरुण शौरी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘केंद्र सरकारला नामोहरम करण्यासाठी महाआघाडीतील कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. १९७७ मध्येही इंदिरा गांधींच्या विरोधात कोणताच चेहरा नव्हता,’ असे सांगतानाच ‘कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत राजकारण खूप मोठे असते,’ असे शौरी यांनी स्पष्ट केले.
२५ वर्षानंतर बसप आणि सपाने एकत्र येऊन भाजपचा पराभव केला. त्याबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले. विरोधी पक्षांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले पाहिजे, असे सांगून विरोधकांच्या विरोधात भाजपने उघडलेल्या मोहिमेवरही त्यांनी टीका केली. दरम्यान, आता शौरी  यांच्या वक्तव्यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)