मोदींच्या दौऱ्याआधी पाकवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतू, आता अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानवर हल्ला करण्याची ट्रम्प प्रशासनाने तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतावद्यांच्या तळांवर अमेरिकन सैन्याचे ड्रोन हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचाही पुनर्विचार केला जाण्याची शक्‍यता आहे. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या लढाईचा एक भाग म्हणून पाकिस्तानी हद्दीत ड्रोन हल्ले नवे नाहीत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानाच्या सीमा भागात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. हे तळ उद्‌वस्त करण्यासाठी अमेरिकन लष्कराने अनेकदा ड़्रोन विमानांचा वापर केला आहे. अनेकदा ही कारवाई पाकिस्तानच्या हद्दीत जाऊनही केली जाते. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्य आक्रमक झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या कारवाईला विशेष महत्व असल्याचे बोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)