मोदींची जात काढणा-या कॉंग्रेस नेत्याची दिलगिरी 

राहुल गांधींनी दिली तंबी

जयपूर –
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री उमा भारती, साध्वी प्रज्ञा व साध्वी ऋतंबरा यांच्यावर टीका करताना त्यांची जात काढणारे कॉंग्रेस नेते सी. पी. जोशी यांनी अखेर आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दु:ख व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीआधी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी हे टीकेचे धनी बनलेले होते.

त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फटकरल्यानंतर सीपी जोशी यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून खेद व्यक्त केला.
नाथद्वारामध्ये एका सभेदरम्यान सी पी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित करुन निशाणा साधला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोशी यांच विधान पक्षाला अडचणीत टाकू शकते, हे लक्षात आल्यावर राहुल गांधी यांना डॅमेज कंट्रोलसाठी समोर यावे लागले. सी पी जोशी यांचे विधान कॉंग्रेस पक्षाच्या आदर्श आणि तत्त्वांच्या विपरित असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

-Ads-

सीपी जोशी यांच्या विधानानंतर राहुल गांधी यांनी त्यांना खेद व्यक्त करण्यास सांगितले. गांधींनी ट्‌वीटमध्ये म्हणाले की, “सीपी जोशी यांचे वक्तव्य कॉंग्रेस पक्षाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. पक्षाच्या नेत्यांनी असे कोणतेही विधान करु नये. ज्यामुळे समाजातील एखाद्या घटकांच्या भावना दुखावतील. कॉंग्रेसच्या मूल्यांचा, कार्यकर्त्यांच्या भावनांना आदर करुन जोशी यांना चुकीची जाणीव नक्कीच होईल. त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करायला हवा, असे म्हटले.

राहुल गांधी यांनी तंबी दिल्यानंतर काही वेळातच सीपी जोशी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या विधानावर खेद व्यक्त केला. त्यांनी लिहिले आहे की, “कॉंग्रेसच्या मूल्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत, माझ्या वक्तव्याने समाजाच्या कोणत्याही वर्गाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मी खेद व्यक्त करतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)