मोदींचा आणखी एक फुगा फुटला ; राष्ट्रवादीची टीका

मुंबई: अमेरिका आणि ब्रिटन यांनी व्हायब्रंट गुजरातमधली भागीदारी संपवत मोदींना गुड-बाय केलाय. सपनों के सौदागर असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक फुगा त्यामुळे फुटला आहे. पंतप्रधान होण्यासाठी मोदींनी अशी अनेक स्वप्नं विकली होती, अशी टीका राष्टवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री होऊन दोन वर्षं झाल्यावर मोदींनी हे व्हायब्रंट गुजरातचं स्वप्न विकलं होतं. ब्रिटन, अमेरिकेसारखे देशही त्याला भुलले. पण, वास्तवाच्या टाचणीने फुगा फुटलाय. १८ ते २० जानेवारी या कालावधीत यंदाचा व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम होतोय. ब्रिटनने आपण या कार्यक्रमात भागीदार नसू, अशी घोषणा केल्याचं वृत्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.  ‘मोदींना स्टेज रिकामाच असलेला आवडतो, यंदा तो तसाच असेल’ अशी टीका त्यांनी केली आहे.

मोदींचा आणखी एक फुगा फुटला…

मोदींचा आणखी एक फुगा फुटला…अमेरिका आणि ब्रिटन यांनी व्हायब्रंट गुजरातमधली भागीदारी संपवत मोदींना गुड-बाय केलाय. सपनों के सौदागर असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक फुगा त्यामुळे फुटला आहे. पंतप्रधान होण्यासाठी मोदींनी अशी अनेक स्वप्नं विकली होती. गुजरातचे मुख्यमंत्री होऊन दोन वर्षं झाल्यावर मोदींनी हे व्हायब्रंट गुजरातचं स्वप्न विकलं होतं. ब्रिटन, अमेरिकेसारखे देशही त्याला भुलले. पण, वास्तवाच्या टाचणीने फुगा फुटलाय. १८ ते २० जानेवारी या कालावधीत यंदाचा व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम होतोय. ब्रिटनने आपण या कार्यक्रमात भागीदार नसू, अशी घोषणा केल्याचं वृत्त आहे. तर अमेरिकेने या आधीच व्यापारविषयक काही मुद्दे प्रलंबित असल्याचं कारण देत अंग काढून घेतलं होतं. २०१५ आणि १७मध्ये अमेरिकेनं जी गुंतवणूक व्हायब्रंट गुजरातच्या अंतर्गत केली होती, त्यावर मिळालेला परतावा निराशाजनक होता. त्यामुळे अमेरिकेने अंग काढून घेतल्याची कुजबूज आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना चांगलाच टोला लगावलाय. मोदींना स्टेज रिकामाच असलेला आवडतो, यंदा तो तसाच असेल, अशा आशयाचं ट्विट राहुल यांनी केलंय. संदर्भ – https://bit.ly/2CFZMZA

Posted by Nationalist Congress Party – NCP on Tuesday, 1 January 2019

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)