मोदींकडे किती पदव्या आहेत? – काँग्रेस नेते संजय निरुपम 

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विवादात्मक भाष्य केले होते. परंतु, ते त्याच्या विधानांना विवादात्मक आणि चुकीचे मानण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी मोदींच्या बाबतीत जे विधान केले त्यात काही चुकीचे नसून ते अजूनही त्यावर कायम आहेत.

संजय निरुपम पुढे म्हणाले, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये पंतप्रधान देव नाही. त्या पदाचा आदर करून सर्व बोलतात . मी ज्या शब्दांचा वापर केला ते अभद्र नाहीत.

पंतप्रधान मोदी यांच्या सुरुवातीच्या जीवनावर आधारित चित्रपटाला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळात दाखवण्यात येणार असल्याच्या बाबीमुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पंतप्राधन मोदींना अशिक्षित म्हटले होते.  ते पुढे असेही म्हणाले की, ”  जबरदस्तीने चित्रपट दाखवणे चुकीचे आहे. लहान मुलांना राजकारणापासून दूरच ठेवायला पाहिजे.”

मोदीसारख्या अशिक्षित आणि निरक्षर व्यक्तीवर बनलेला चित्रपट पाहुन लहान मुले काय शिकणार? निरुपम म्हणाले , “मुलांना आणि लोकांना हेदेखील माहिती नाही की मोदींकडे किती पदव्या आहेत. “


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)