मोदींकडून इम्रान खान यांना चर्चेसाठी कोणतेही निमंत्रण नाही

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथ ग्रहणानंतर आज त्यांच्या कॅबिनेट मंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री व पाकिस्तान तहेरिक-ए-इंसाफ पक्षाचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठा दावा केला आहे.

इस्लामाबादमध्ये शपथ ग्रहणानंतर महमूद कुरेशी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून चर्चा करण्याचे आवाहन केले असल्याचा दावा केला आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसल्याही प्रकारचे आवाहन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदींनी इम्रान खान यांना फक्त शुभेच्छा दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, इम्रान खान यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा देणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहले होते. याच पत्राच्या आधारावर शाह महमूद यांनी चर्चेचा दावा केला आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)