मोदक गुळाला अधिक भाव

नीरा बाजारात समितीत मागणी अधिक आवक कमी; 4051 क्विंटल भाव
राहुल शिंदे
निरा, दि. 28 – साखर कारखाने एफआरपीच्या मुद्यावर कोंडीत सापडल्याने गुऱ्हाळ चालकांना याचा लाभ होत असून गुळाचे उत्पादन वाढू लागले आहे. निरा बाजार कृषि उत्पन्न बाजार समितीत अन्य गुळाची आवक होत असली तरी मोदक गुळाला मागणी चांगली असताना आवक मात्र कमी होत आहे. गुळाला 3851 ते 4051 क्विंटल असा भाव मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय गाडेकर यांनी दिली.
गणेशोत्सवामुळे गुळाला चांगली मागणी असून निरा गुळ बाजारात आवकही चांगली होत आहे. परंतु, मोदकाकरिता गुळाची आवक मात्र कमी आहे. साखरवाडी आणि केडगाव, दौंड परिसरातून मोदक गुळाची गेल्या दोन दिवसात केवळ 140 किलो आवक झाल्याने भाव वधारून 5500 रूपये क्विंटलवर पोहचले होते. 1 किलो ढेप – 3851 ते 4051 क्विंटल, 1/2 किलो ढेप – 4000 ते 4250 क्विंटल आणि बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या पावशेरच्या ढेपीला – 4100 ते 4226 क्विंटल असा दर मिळाला. खुल्या बाजारात गुळाच्या दराची स्पर्धा सध्या साखरेच्या दराशी आहे. सध्या, साखरेला एस. साखर 3610 रूपये क्विंटल आणि एम. साखर 3715 रूपये क्विंटल आहे. सणासुदीच्या काळात गुळाचे दर सातत्याने चढे राहतात, असेही सभापती गाडेकर यांनी सांगितले.
नीरा गुळाच्या बाजारात फुटणारा गुळाचा दर राज्याच्या बाजारात अंतिम मानला जातो, याशिवाय कोल्हापुरातही नीरा येथे ठरलेल्या गुळाच्या दरावरच सौदे होतात. जुन ते नोव्हेबर हा गुळाचा मुख्य हंगाम मानला जातो. त्यातच ऑगस्ट महिन्यात गुळाचे दर वाढीस लागतात. हा दर दिवाळीपर्यंत कामय राहतो. डिसेंबर अखेरपर्यंत गुळाचे सौदे बाजारात सुरू असतात. याच कालावधीत गुळाला उच्चांकी भाव मिळून गेले आहेत. नीरा बाजारात गेल्या आठवड्यात 300 क्विंटल गुळाची आवक झाली होती त्यावेळी गुळाला सर्वाधिक म्हणजे 4051 क्विंटल भाव मिळाला होता. आज, बाजारात गुळाची 250 क्विंटलच्या आसपास आवक झाली. सध्या, नीरा बाजारात नीरा परिसरातील पिंपरे, साखरवाडी आणि केडगाव, दौंड या भागातील गुऱ्हाळातून आवक होत असल्याचे सभापती गाडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)