मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 325 जणांची तपासणी

लोणावळा – लोणावळ्यातील श्री नारायणी सेवा संस्थान, श्री नारायणी नारी चेतना केंद्र आणि डॉ. एम. डी. राणा व श्रीमती के. एम. राणा चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रज्योत आय हॉस्पिटल पनवेल यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा सुमारे 325 जणांनी लाभ घेतला. या शिबिरात तपासणीमध्ये आढळलेल्या 35 मोतीबिंदू रुग्णांच्या मोतीबिंदूवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

लोणावळ्यातील श्री नारायणी सेवा संस्थान, श्री नारायणी नारी चेतना केंद्र आणि डॉ. एम. डी. राणा व श्रीमती के. एम. राणा चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रज्योत आय हॉस्पिटल पनवेल यांच्या वतीने रविवारी (दि. 27) मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्‌घाटन श्री नारायणी सेवा संस्थान, श्री नारायणी नारी चेतना केंद्राचे विश्‍वस्त मधुसूदन झुनझुनवाला, काशीप्रसाद मोररका, राजेंद्र झुनझुनवाला, परमेश्‍वरजी तुलशियान, शामसुंदर पंन्सारी, डॉ. एम. डी. राणा, डॉ. दिलीप सुराणा, राजेंद्र महर्षी आदींच्या हस्ते झाले.

या शिबिरात लोणावळा आणि परिसरातील 325 नागरिकांनी सहभाग घेतला होता. शिबिरात 165 जणांना मोफत चष्मे देण्यात आले असून, शिबिरात तपासणी अंतर्गत 35 जणांना मोतीबिंदू झाल्याचे आढळले आहे. या सर्व मोतीबिंदू बाधितांच्या मोतीबिंदूवर श्री नारायणी सेवा संस्थान, श्री नारायणी नारी चेतना केंद्र लोणावळा यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)