बरेली : देशात एकीकडे कठुवा आणि उन्नावच्या बलात्कारच्या घटनांचे पडसाद उमटत असताना दिसत आहेत. त्यासाठी मोर्चे, निदर्शने करण्यात येत आहेत. या सर्व घडामोडीत केंद्रातील एका नेत्याने याविषयावर मुक्ताफळे उधळली आहेत.
बलात्काराच्या घटना थांबवता येऊ शकत नाहीत, त्यामुळे एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एखाद-दुसऱ्या घटना घडल्या, तर त्याचे अवडंबर माजवू नका, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी केले आहे.
कठुआ आणि उन्नाव बलात्काराच्या पार्श्वभूमीवर गंगवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.’अशा घटना दुर्दैवी परिस्थितीत घडतात. सरकार याबाबत योग्य ती पावले उचलत आहे’ असे गंगवार म्हणाले. जम्मू आणि काश्मिरमधील कठुआत चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर संतोष गंगवार प्रतिक्रिया देत होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा