मोठ्या कारवाईसाठी हवाईदलाने दलाने तयार रहावे

हवाई दल प्रमुखाचे 12 हजार अधिकाऱ्यांना पत्र

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोवा यांनी हवाई दलाच्या सर्व अधिकाऱ्यांना कमी वेळेत मोठी कारवाई करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. धनोवा यांचे हे पत्र हवाई दलाच्या जवळपास 12,000 अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर 30 मार्चची स्वाक्षरी आहे. धनोवा हे हवाई दलाचे प्रमुख बनल्यानंतर त्यांनी 3 महिन्यानंतर हे पत्र लिहिले आहे.
धनोवा यांनी सध्या स्थितीवर जी पाकिस्तानकडून लपून हल्ले होत आहेत त्यावर हे हे पत्र जारी करण्यात आले आहे. असे पहिल्यांदा झाले आहे की, हवाई दलाच्या प्रमुखांनी पत्राद्वारे अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली आहे. त्यांनी भारताच्या आजुबाजुला वाढता धोका पाहता अलर्ट जारी केले आहे. कोणत्याही क्षणी खूप कमी वेळात कारवाईसाठी बोलवले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.
हवाई दलाकडे संसाधनांची कमी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आपल्याला स्वत: नव्या नव्या तांत्रिक गोष्टींची अपडेट असली पाहिजे. याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. प्रमोशन आणि असाइनमेंटमध्ये भेदभाव बाबतही त्यांनी या पत्रामध्ये लिहिले असल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही प्रकारचा पक्षपात, यौन शोषणाच्या घटना सहन नाही केल्या जाणार असे देखील म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)