मोठे व्यवहार केले आहेत?

प्राप्तीकर खात्याने मोठे व्यवहार करूनही रिटर्न दाखल न करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. यासंदर्भात विभागाकडून अशा मंडळीची ओळखही पटवली गेली असून ज्यांनी 2017-18 या आर्थिक वर्षात मोठे व्यवहार केले; परंतु प्राप्तीकर विवरणपत्र भरलेले नाही, त्यांना नोटीस पाठविली जाणार आहे. येत्या 21 दिवसांत प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा सल्ला दिला आहे किंवा ऑनलाइन सिस्टिमच्या मदतीने आपली बाजू मांडावी, असेही नमूद केले आहे. परंतु अशा प्रकारच्या कृतीचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.

या कामासाठी प्राप्तीकर विभागाने डेटा अॅनालिटिक्‍सचा वापर करून नॉन फाइलर्स मॉनिटरिंग सिस्टिमच्या माध्यमातून रिटर्न दाखल न करणाऱ्यांची ओळख पटवली आहे. निश्‍चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कमेच्या व्यवहारावर सीबीडीटीने इशाराही दिला आहे. प्राप्तीकर काद्यानुसार रोख व्यवहारांसंदर्भात जी मर्यादा निश्‍चित केली आहे, त्यापेक्षा अधिक रोख रकमेने व्यवहार केल्यास आपल्याला अडचणींचा सामनाही करावा लागणार आहे. सध्या निश्‍चित मर्यादेनुसार दोन लाखांपेक्षा अधिक रक्कमेने रोख व्यवहार करता येत नाहीत. एवढेच नाही तर नातेवाईक, पती किंवा पत्नीकडून एक दिवसात दोन लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम घेऊ शकत नाही. केवळ लग्न समारंभप्रसंगी वेगवेगळ्या दुकानातून दागिने खरेदी कले जात असतील तर त्याच्या मर्यादेत शिथिलता आणली आहे. जर दुकानदारांकडून नियमाचा भंग केला जात असेल तर त्याला प्राप्तीकर विभाग रोख रकमेच्या व्यवहाराइतकाच दंडही भरावा लागणार आहे.

रोख स्वरूपात कर्जांसाठी देखील नियम तयार केले आहेत. कर्जाच्या स्थितीत वीस हजार रुपयांपर्यंत रोख व्यवहार करू शकतात. याशिवाय अधिक कर्जासाठी आपल्या बॅंकेची निवड करावी लागणार आहे. यानुसार कर्ज परत करण्याबाबतही सर्वांना समान नियम लागू केले आहेत.

– जगदीश काळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)