मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पिंपरी – भरधाव वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-मुंबई मार्गावर रविवारी (दि. 16) रात्री दहा वाजता ही घटना घडली.

वैभव बाळासाहेब ननावरे (वय 27, रा. स्पाईन रस्ता, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, विठ्ठल ननावरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या विठ्ठल ननावरे यांचा पुतण्या वैभव हा दुचाकीवरून बावधन येथून काळेवाडीच्या दिशेने जात होता.

दरम्यान, बावधन येथील हॉटेल शिवप्रसाद जवळ त्याच्या दुचाकीला वाहनाची धडक बसली. त्यात गंभीर जखमी होऊन वैभवचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि अपघाताची माहिती न देता पळून गेल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. एल. टोणपे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)