मोटारसायकल स्वार झाडाला धडकून ठार

भवानीनगर – सणसर येथे बारामती-इंदापूर रस्त्यावर बुधवारी (दि.16) मध्यरात्री मोटार सायकलस्वार रस्त्यालगतच्या झाडाला धडकुन जागेवरच ठार झाला.

याबाबत प्रशांत साठे (वय 24, रा. पिंपळी, ता. बारामती) याने वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात धनंजय पवार (वय 40, रा. पिंपळी) या मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. धनंजय पवार हे मोटारसायकल (क्र. एमएच 42 पी 5801) वरुन बारामतीकडुन इंदापुरकडे बुधवारी मध्यरात्री निघाले होते. सणसर येथील आल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या झाडाला ते जोरात धडकल्याने त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागला ते रस्त्यातच बेशुध्द पडले. अपघात झाल्याचे पाहुन या ठिकाणी जमलेल्या युवकांनी 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. काही वेळेत या ठिकाणी रूग्णवाहिका आल्यानंतर त्यातील डॉक्‍टरांनी पवार यांची तपासणी केली. जास्त रक्तस्त्राव झाल्याने पवार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. अपघाताचा पुढील तपास भवानीनगर पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस हवालदार वसंत वाघोले करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)