मोटारसायकलच्या डिक्कीतून 13 लाख रूपये लंपास

नगर – भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुईकोट किल्ला येथे 13 लाख रूपये चोरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, फिर्याद वनश्री अक्षय गांधी (रा.बोल्हेगाव राजमाता कॉलनी ,अ.नगर ) हे प्रजासत्ताक दिना निमित्त भुईकोट किल्ला येथे कार्यक्रम पाहण्यासाठी गेले असता. किल्लयाच्या बाहेर एमएच.16 बी डब्ल्यु 2369 या क्रमांकाची मोपेड मोटारसायकल पार्किंग मध्ये लॉक करून लावलेली असतांना अज्ञात चोराने मोटारसायकलचे लॉक तोडून गाडीच्या डिक्कीतून 13 लाख 50 हजार रूपये तसेच 10 हजार रूपयांचा नामाकिंत कंपनीचा मोबाईलल व पॅन कार्ड, आधार कार्ड दोन एटीएम व युनीयन बॅकंचे चेकबुक चोरल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)