मोझांबिकमध्ये मोटर कार दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू

मापुटो (मोझॅंबिक) – दक्षिंण आफ्रिकेतीला मोझॅंबिक या देशात रविवारी सकाळी झालेल्या एका मो
टर कार दुर्घटनेत किमान 23 जण ठार झाले आहेत आणि अन्य 30 जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी हा अपघात झाला आहे. मोटार कारमुळे झालेला हा देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात असल्याचे वाहतूक पोलीस ओरमुख पाऊली लांगा यांनीींसांगितले आहे.

जवळच्या बारमधून भांडण करून बाहेर पडलेल्या मोटर कारचालकाचे पळून जाण्याच्या नादात गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावरील लोकांमध्ये घुसली. हा “ड्रायव्हर मद्याच्या नशेत धुंद होता. त्याच्या हातून झालेल्या या दुर्घटनेत मरण पावलेल्या 23 पैकी 21 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये मोटर कार चालकाचाही समावेश आहे. तर बाकी दोन जण मापुटो सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मरण पावले. या दुर्घटनेत अन्य 30 जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. मरण पावलेल्या आणि जखमींमध्ये मापुटो शहराच्या लुईस कॅब्रल या भागात राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)