मोक्‍यातील आरोपीला अटक

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) – दत्ता जाधव याच्या टोळीतील मोक्‍क्‍यातील आरोपी व जत येथे पोलिसांच्यावर झालेल्या हल्य्यातील मुख्य आरोपी असलेल्या विजय उर्फ भेज्या दिलीप वाघमारे रा. प्रतापसिहं नगर याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
विजय वाघमारे याच्यावर सोनसाखळी चोरी, दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून 2017 मधील एका जबरी चोरीत तो सातारा पोलिसांना हवा होता. पोलिस त्याच्या मागावर असतानाच त्याने कुख्यात गुंड दत्ता जाधव याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर जत जि. सांगली येथे हल्ला केला होता. विजय याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असल्याने व तो दत्ता जाधव याच्या अनेक गुुन्ह्यात त्याचा साथीदार असल्याने त्याच्यावर मोक्का कायद्याने कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून फरार असलेला भेज्याला अखेर पो.नि. नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष भिसे, अनिल स्वामी व पथकाने शनिवारी रात्री ताब्यात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)