मोक्‍कातील फरार आरोपी जेरबंद

पिंपरी – मोक्कातील फरार आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या कडून 2 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

लक्‍कडसिंग शितलसिंग दुधानी (वय-29, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा) असे त्याचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्यात 16 ऑगस्ट रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करताना लक्कडसिंग याला हडपसर भागात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने तीन साथीदारांसोबत एका कारची चोरी केली. या कारचा नंबर बदलून शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार, सहकार नगर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)