मोक्‍कातील आरोपींना पोलिसांकडून अटक

पिंपरी – पुणे रेल्वे स्थानकावरुन पळून जाणाऱ्या मोक्‍कातील तीन आरोपींना चिंचवड पोलिसांनी शिताफीने बुधवारी (दि. 8) अटक केली आहे. यातील तीनही आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

विकी उर्फ विकास अंकुश भिसे (रा. दळवी नगर, वडगाव मावळ), प्रितम आवतारे (रा. थेरगाव), राजू उर्फ राजकुमार हिरवे (रा. दळवी नगर, चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील विकीवर चिंचवड येथे सहा, निगडी येथे दोन व पिंपरी येथे एक असे गुन्हे दाखल असून त्यामध्ये दरोड्याचा प्रयत्न,घरफोडी, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल असून तो फरार होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर प्रितम याच्यावर वाहन चोरी व हत्याराने मारहाण करणे, घरफोडी असे गुन्हे दाखल असून त्याच्यावर चिंचवड येथे चार तर वाकड येथे दोन गुन्हे दाखल आहेत. तिसरा आरोपी हिरवे याच्यावरही चिंचवड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून त्यामध्ये चोरी व मारहाण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशला पळून जात असल्याची माहिती चिंचवड तपास पथकाचे पोलीस नाईक विजयकुमार आखाडे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी तातडीने चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्‍वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार जगताप, पोलीस नाईक शिरसाठ, आखाडे,डोके, वरणेकर यांनी पुणे रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)