पुणे- महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का), खून आणि अनुसुचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार अमोल अशोक माळी (वय 30) याचा जामिन अर्ज विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी फेटाळला.
अजित वसंत वाघमारे (वय 32, रा, तारदाळ, हातकणंगले) यांना घरातून पळवून नेऊन कर्नाटकात खून केल्याच्या आरोपावरुन माळी याच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 एप्रिल 2016 रोजी घडली होती. या प्रकरणी दीपाली अजित वाघमारे (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे. टोळी प्रमुख माळी याला 13 ऑगस्ट 2016 रोजी अटक करण्यात आली होती. खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा करीत माळी याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. माळी हा टोळीचा प्रमुख असून, त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात जामिनावर असताना त्याने दुसरा गुन्हा केला आहे. त्याच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा आहे. साक्षीदारांच्या जबाबातही त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे अरोपीस जामिन देऊ नये असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने माळी याचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)