मोक्कातील फरार संशयीतास मुंबईतून अटक

शिरवळ, 22 (वार्ताहर) -मोक्का अंतर्गत कारवाईनंतर वर्षापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने मानखुर्द (मुंबई) येथून ताब्यात घेतले. त्यास पुणे मोक्का न्यायालयानत हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन अशोक साळूंखे उर्फ आप्पा (रा. भादे ता. खंडाळा जि.सातारा) याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर एक वर्षापासून तो फरारी होता. तो मानखुर्द (मुंबई) येथे वास्तव्यास असल्याची माहिती शिरवळ पोलीसांना मिळाली. त्यानंतर फलटण पोलीस विभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, शिरवळ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग हजारे, पोलीस हवालदार अमोल जगदाळे, वैभव सुर्यवंशी, स्वप्निल दौंड, यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच साळुंखे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलीसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पुणे येथील मोक्का
न्यायालयात त्यास हजर केले असता न्यायालयाने बुधवार (दि. 28 ) पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास फलटण पोलीस विभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)