मोई परिसरात खुरपणीच्या कामांना वेग

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील मोई परिसरात खरीप हंगामातील पिकांच्या खुरपणीला सुरवात झाली आहे. या कामासाठी मजूरांची टंचाई जाणवत असल्याने शेतकरी वर्ग स्व:त राबत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या महिन्यात चिंबळी, मोई निघोजे, केळगाव, माजगाव, मरकळ, सोळू, धानोरे आदी भागातील शेतकरी वर्गानी खरीप हंगामातील पेरणी केलेल्या सोयाबीन, वाल, मूग इत्यादी पिकांना आठ ते दहा दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमाने आली आहेत. परंतु, त्यानंतर झालेल्या रिमझिम पावसाने गवताचे तण मोठ्या प्रमाणात उगवले आहे.
त्यामुळे खुरापणी करण्यासाठी शेतकरी वर्ग धास्तावले असून या कामासाठी मजूरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी स्व:त खुरपणीचे काम करीत आहेत. तर काही शेतकरी भोसरी, आळंदी, चाकण येथील मजूर अड्ड्यावर जाऊन मजूरांना शेतात कामासाठी घेउन येत आहेत. या परिसरात गेल्या पाच वर्षांपासून खरीप हंगामातील भुईमुग, बाजरी पेक्षा सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. परिसरातील शेतकरी जवळजवळ 80 टक्के सोयाबीनचे पीक घेत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)