चिंबळी-खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील औद्योगिक क्षेत्रात व जिल्हा परिषद व पंचायत गणातील व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जवळ येत असलेल्या मोई-निघोजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे येथील ग्रामस्थांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या चिखली परिसरात जाणे-येणे मोठे कसरतीचे झाले आहे.
निघोजे ते मोई रस्त्यावर औद्योगिक क्षेत्रामुळे जड मालवाहू गाड्यांची व खडीक्रशर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, या संपूर्ण रस्त्यावर खडी व डांबरीकरण उखडून गेले आहे. जवळपास एक-एक फट खोल खड्डे पडून रस्त्याची अवस्था बिकट झाली असल्याने मोई, निघोजे येथील कामगारवर्गाला तसेच शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांना पायी चालणे मोठे अवघड झाले आहे. मोई गावठाण हद्दीतील मराठी शाळा व निघोजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने ठिकठिकाणी पाण्याची गटारे साचली असून चारचाकी वाहन जात असतांना गटारातील साचलेले पाणी दुचाकीस्वारांचा अंगावर उडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, तर गावठाण हद्दीत मेन चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने पायी चालताना, दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)