मोईत विद्यार्थिनींना टॅबलेट वाटप

चिंबळी- नन्ही कली या प्रकल्प अंतर्गत मोई (ता. खेड) येथील इंदिराजी माध्यमिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलींना नुकतेच टॅबलेट वाटप करण्यात आले. असल्याची विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे यांनी दिली.
नंदी फाउंडेशन (हैद्राबाद) यांच्या वतीने मोई येथील शाळेतील विद्यार्थिनींना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने नन्ही कली प्रकल्पांतर्गत टॅबलेट संच वाटप करण्यात आले. शाळेचे सचिव तुकाराम उर्फ बाबा गवारे, कार्याध्यक्ष आनंदा दामू गवारे यांचे हस्ते टॅबलेट वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे, जोशी सर, गिरी सर, चौधरी सर कळसकर सर, ताजने सर, रवींद्र गवारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)