मोईकडे जाणाऱ्या साकव पुलाची दुर्दशा

चिंबळी- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून कुरूळी (मुऱ्हे वस्ती) मोई गावाकंडे जाणाऱ्या रस्त्याची आणि साकव पुलांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असल्याने वाहन चालकासह प्रवासी देखील हैराण झाले आहेत.
खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरुळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून मोई गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर जडमालवाहू गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून, या रस्त्याने प्रवास करणे अतिशय अवघड झाले आहे. या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण आणि खडीकरण उखडले असल्याने मातीचा फुफाटाच सगळीकडे उडत आहे. या रस्त्याचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यानतंर फक्त डागडुजी करण्यात आली, तीसुध्दा दोन-तीन महिन्यात उखडली गेली असल्याने, गेल्या तीन-चार महिन्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर बंद पडत असल्याने येथील ग्रामस्थांना चिंबळी फाटा येथे जाण्या-येण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मुऱ्हेवस्ती येथील साकव पुलाचे लोखंडी संरक्षण कठडे तुटले आहे, तर या ठिकाणी रस्ताही अरूंद आहे, त्यामुळे चारचाकी वाहने नेताना अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे या रत्स्याचे डांबरीकरण आणि साकव पुलांची दुरुस्ती करण्यात याव्ही, अशी मागणी माजी उपसंरपच मारुती मुऱ्हे वस्ती आशिष मुऱ्हे, सतीष मुऱ्हे आदी मान्यवरांनी केली असून, या रस्त्याच्या दुरुस्तीचे गेल्या चार वर्षांपासून देत आहे; पण रस्त्याची मात्र दुरुस्ती केली जात नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)