मॉलमध्ये पाणी, स्वच्छतागृहे मोफत द्या

सर्व मॉल्सला नोटीस द्या


शहर सुधारणा समितीचे आदेश

पुणे – मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांना पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अव्वाच्या-सव्वा पैसे मोजावे लागतात. ग्राहकांची संख्या प्रचंड असूनही स्वच्छतगृहे उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यामुळे मॉलचालकांनी या सर्व सुविधांची तातडीने उपलब्ध करावी, असा प्रस्ताव महापालिका शहर सुधारणा समिती बैठकीत मान्य करण्यात आला आहे.

मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नियमानुसार पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा मोफत उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. परंतु अनेक ठिकाणी ही सुविधा दिली जात नाही. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत प्रत्येक मॉलने दर्शनी भागावर या सुविधेबाबत स्पष्ट सूचना लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– सुशील मेंगडे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती.

या संदर्भांत सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्याचा सूचना प्रशासनासदिल्याची माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी दिली. शहरातील बहुतांशी मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात.

सध्या शहरातील मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये एक लिटर पाण्याच्या बॉटलसाठी 20 ते 25 रुपये मोजावे लागतात. हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. परंतु पाण्यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे द्यावेच लागतात. त्यामुळे मॉलमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने त्यांना पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राणी भोसले यांनी मांडला होता. त्यास अखेर मान्यता देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)