“मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लंपास

पिंपरी – मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 7) सकाळी साडेसहाच्या सुमारास वाकड येथील काळाखडक परिसरात घडली.

याप्रकरणी पार्वती नामदेव पवार (वय-57, रा. मुंजाबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोटार सायकलवरील दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. वाकड येथील काळाखडक रात्यावरून चालत असताणा पाठीमागून मोटारसायकलीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)