“मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या मुलाचा मृत्यू

– आई-वडिलांचा एकुलता एक आधार गेला

पिंपरी – आपल्या चुलत व आतेभावांसोबत “मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा मिनी बसच्या धडकेत मृत्यू झाला. अपंग आई-वडिलांचा एकुलता आधार असणाऱ्या या मुलावर काळाने घाला घातला. हा अपघात गुरुवारी (दि. 12) सकाळी सहाच्या सुमारास नाशिक फाटा, कासारवाडी येथे घडला. विशेष म्हणजे हा मुलगा अपंग आई-वडिलांसाठी एकमेव आधार होता.

-Ads-

प्रतीक परमेश्वर सावंत (वय-12, रा. आनंदनगर, पिंपळे गुरव, मूळ रा. सुलतानपूर, ता. जि. बीड) असे अपघातात मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिकचा आतेभाऊ सुरज चंदनशिवे (वय-22, रा. आनंदनगर, पिंपळे गुरव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांढऱ्या रंगाच्या मिनी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक आपला आतेभाऊ सुरज आणि चुलतभाऊ अमोल सावंत यांच्यासोबत सकाळी सहाच्या सुमारास “मॉर्निंग वॉक’साठी गेला होता. कासारवाडी येथील भोसरी-नाशिक फाटा ओव्हर ब्रिजवरील बीआरटी रोड मधून तिघे जात होते. या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या मिनी बसने प्रतीकला धडक दिली. ही धडक इतकी जोरात लागली की, प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. मिनी बस चालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला. प्रतीकचे आई व वडील दोघेही जन्मत: अपंग असून दोघेही उदर निर्वाहासाठी बीडवरून इथे आले होते. त्यांना प्रतीक हा एकुलता एक व सदृढ मुलगा होता. या आई-वडिलांसाठी प्रतीक हा त्यांच्या जगण्याचा व भविष्याचा एकमेव आधार होता. महिला पोलीस उपनिरीक्षक एन. ए. डावरे पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)