मॉडेल सोफियाचा वर्षभरात घटस्फोट

मॉडेल ते नन बनलेली बिग बॉसची एक्स स्पर्धक सोफिया हयात पुन्हा चर्चेत आली आहे. एका वर्षातच तिने पतीपासून घटस्फोट घेतला आहे. सोफियाने व्लाड वर फ्रॉड असल्याचा आरोप करत त्याला घरातून बाहेर काढले आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, सोफियाने काही दिवसांपुर्वी तिने आपल्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती पण गर्भ काढल्याची माहिती समोर येत आहे. आपला नवरा सैतान आणि चोर असल्याचे तिने सांगितले. काही दिवसांपुर्वी तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ‘don’t keep calm cause finally its over.’ असे लिहिले होते. तेव्हापासूनच त्या दोघांच नातं तुटल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

दुसऱ्या पोस्टमध्ये तिने पतीवर आरोप केले. टतु इंटेरियर डिझायनर असल्याच खोट सांगितलस, तुझ्यावर खूप सारं कर्ज आहे. तु सांगितल होतस की माझ्यावर तुझं खूप प्रेम आहे पण ते सारं खोट होतं. तु माझ्याकडून सार काही चोरून घेण्याच्या इराद्यात होतास. मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण तु मला चुकीच ठरवलसं. मी तुला माझ घर आणि आयुष्यातुन काढलय. माझ्या आयुष्यात सैतान आला ज्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला. २४ एप्रिल २०१७ला सोफियाने व्लाड स्टेनेस्कुशी लग्न केलं होतं. पतीसोबत ती नेहमी रोमॅंटीक फोटो शेयर करत असे. त्यानंतर तिला ट्रोलही केलं गेलं.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)