मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय स्पर्धा : दुस-या दिवशीही महाराष्ट्राचाच बोलबाला

पुणे – मॉडर्न पेंटॅथलॉनच्या आठव्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस गाजविणा-या यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंचा अपेक्षेप्रमाणे दुस-या दिवशीही बोलबाला कायम राहिला.स्पेनमध्ये होणा-या जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी भारताचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार असल्यामुळे या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात पुरूषांमध्ये महाराष्ट्राच्या ओंकार कुचिकने 200 मीटर जलतरण आणि 1600 मीटर धावणे प्रकारात 17 मिनिटे 14.14 सेंकद वेळेसह प्रथम क्रमांक पटकाविला. महराष्ट्राचा नाथूराम सुर्यवंशी (18 मिनिटे 56.67 सें.)उपविजेता ठरला, तर उत्तर प्रदेशच्या सुधीर शर्माला (20 मिनिटे 18.79 सें.) तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ गटात महाराष्ट्राच्या अजिंक्‍य बालवडकरने 14 मिनिटे 34 सेंकद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. सौरभ पाटील व सुरज रेणूसे अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानी राहिले.

युवा अ’ गटात मुलांच्या शर्यतीतही 200 मीटर जलतरण व 1600 मीटर धावणे हाच प्रकार होता. यात महाराष्ट्राच्या यश जाधवने 14 मिनिटे 48.96 सेंकद वेळेसह प्रथम क्रमांकावर हक्क सांगितला, तर त्याचाच राज्य सहकारी निखिल मिसाळ (16 मिनिटे 4.69 सें.) दुस-या स्थानी राहिला. उत्तर प्रदेशच्या दिशांक सैनीने (16 मिनिटे 58.23सें.) तृतीय क्रमांक पटकाविला.

* इतर निकाल :
= मुली (200 मीटर जलतरण व 1600 मीटर धावणे) : नयना बोरकर – 17 मिनिटे 1.24सें. (महाराष्ट्र), अहिल्या चव्हाण – 17 मिनिटे 7.42सें. (महाराष्ट्र), आस्था ठाकर – 17 मिनिटे 12.28सें. (गुजरात).
युवा ब’ गट मुली (200 मीटर जलतरण व 1200 मीटर धावणे) : आदिती पाटील – 14 मिनिटे 19.97सें., स्वरूपा रावस – 15 मिनिटे 8.23सें., साक्षी सली – 15 मिनिटे 50.23सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा क’ गट मुली (100 मीटर जलतरण व 800 मीटर धावणे) : जुई घम – 8 मिनिटे 13.12सें., मानसी मोहिते – 9 मिनिटे 7.11सें., गौरी चव्हाण – 9 मिनिटे 34.14सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा ड’ गट मुली (50 मीटर जलतरण व 400 मीटर धावणे) : मुग्धा वाव्हळ – 4 मिनिटे 14.42सें., वैभवी देसाई – 4 मिनिटे 16.45सें., मनाली रत्नोजी – 4 मिनिटे 22.80सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा ई’ गट मुली (50 मीटर जलतरण व 400 मीटर धावणे) : वैष्णवी आहेर – 4 मिनिटे 13.98सें., रूजुला कुलकर्णी – 4 मिनिटे 53.99सें., मैथीली चिटणीस – 5 मिनिटे 3.38सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा फ’ गट मुली (50 मीटर जलतरण व 200 मीटर धावणे) : कायल पीएस – 3 मिनिटे 52.47सें. (पॉण्डेचेरी), श्रावणी निलवर्णा – 3 मिनिटे 53.26 सें. (महाराष्ट्र), मिहिका सुर्वे – 3 मिनिटे 53.46सें. (महाराष्ट्र).

= मुले :-
युवा गट (100 मीटर जलतरण व 800 मीटर धावणे) : सिद्धांत पातकी – 7 मिनिटे 8.31 से. (महाराष्ट्र), सुनील ठाकर – 7 मिनिटे 32.44 सें. (राजस्थान), शिवतेज पवार – 7 मिनिटे 34.61 सें. (महाराष्ट्र).
युवा ड’ गट मुले (50 मीटर जलतरण व 400 मीटर धावणे) : प्रतिक बंग – 4 मिनिटे 8.65सें. (महाराष्ट्र), पलाश ठाकूर – 4 मिनिटे 27.42सें. (महाराष्ट्र), लोकेश बाबेरवाल – 4 मिनिटे 32.32सें. (राजस्थान).
युवा इ’ गट मुले (50 मीटर जलतरण व 400 मीटर धावणे) : आर्य चव्हाण – 4 मिनिटे 26.84सें., अबीर धोंड – 4 मिनिटे 29.77सें., नील वैद्य – 4 मिनिटे 30.8सें. (सर्व महाराष्ट्र).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)