मॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी

निगडी – जागृतपणे मतदान करावे, यासाठी यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात जनजागृती फेरी काढली. मॉडर्नच्या ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण यमुनानगर परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. निवडणूक विभागाकडून 1 ते 31 ऑक्‍टोबर मतदार नोंदणी अभियान चालू आहे. लोकांमध्ये याबाबतची जागृती करण्यासाठी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी फेरीत भाग घेतला. मतदार यादीत नाव नोंदवा, आपले मत आपले भविष्य, लोकतंत्र हम सें, वोट करो गर्व सें, निर्भयपणे मतदान करा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, सारे काम छोड दो सब सें पहले वोट दो अशा घोषणा देत विद्यार्थी संदेश दिला. हवेलीच्या नायब तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य सतीश गवळी, उपकार्यवाह शरद इनामदार, मतदान पर्यवेक्षक हनुमंत सुतार, सुरेखा कामथे, निवडणूक विभाग कर्मचारी प्रशांत पाडळे, बबन उगले यावेळी सहभागी झाले. मतदार नोंदणी अधिकारी मॉडर्नचे शिक्षक शिवाजी अंबिके, मनीषा बोत्रे, सुनंदा खेडेकर, जयश्री चव्हाण, विजय गायकवाड यांनी फेरीचे नियोजन केले. कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)