मॉडर्नची वसंत व्याख्यानमाला सोमवारपासून

निगडी – प्रोग्रेसिव्ह एज्युेकशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल यमुनानगर निगडी मधील वसंत व्याख्यानमाला ( वर्ष 26वे ) सोमवारापासून सुरु होणार आहे.

ही व्याख्यानमाला 23 एप्रिल ते रवि.29 एप्रिल दरम्यान मॉडर्न हायस्कूलच्या प्रांगणात दररोज सायंकाळी. 6.30वाजता होईल. परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संकुलाचे समन्वयक शरद इनामदार यांनी केले आहे. सदर व्याख्यान सप्ताहात सर्व विषयांचा अंतर्भाव करून प्रसिद्ध व्याख्यात्यांना आमंत्रित केले असल्याचे देखील इनामदार यांनी सांगितले.

-Ads-

सोमवारी अरुण घोडके यांचे शिवरायांचे आठवावे रुप या विषयावर, मंगळवारी रामचंद्र देखणे यांचे माती, नाती व संस्कृती या विषयावर, बुधवारी रविंद्र साठे यांचे नक्षलवाद या विषयावर, गुरुवारी अरविंद गोखले यांचे पाकिस्तान काल आणि आज या विषयावर, शुक्रवारी संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांचे पसायदान ते वंदेमातरम, शनिवारी ह.भ.प. विश्‍वास कुलकर्णी यांचे धर्मवीर संभाजी महाराज या विषयावर कीर्तन, रविवारी चंद्रशेखर निलाखे यांचे संतांच्या स्वप्नातील समाज या विषयावर व्याख्यान होणार आहे.

व्याख्यानमाला समारोप समारंभात यंदाचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार माजी विभागीय आयुक्‍त दिलीप बंड यांना मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)