लोणावळा – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून “मॉक टेस्ट’ म्हणजे सराव परिक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी लोणावळा परिसरातील 90 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑन लाईन व ऑफ लाईन रजिस्ट्रेशन केले. लोणावळा शहरात प्रथमच ही परिक्षा झाली. यामध्ये NEET-UG, CET-PCMऑ CET-PCMऑ, CET-L या अभ्यासक्रमाचा समावेश होता. लोणावळा नगर परिषदेच्या उर्दू व मराठी माध्यमिक विद्यालयात ही परिक्षा झाली. मावळ विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव व युवा सेना विस्तारक मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी परिक्षा केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

लोणावळा शहराचे युवा सेना अध्यक्ष तानाजी सूर्यवंशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर संघटक शाम सुतार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संयोजन केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केले. शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक सुनील इंगुळकर, शहर उप प्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधू परदेशी, दिपाली भिल्लारे, संगीता कंधारे, मनिषा भांगरे, जयवंत दळवी, संजय भोईर, श्रीकांत कंधारे, मनीष पवार, मोहन मल्ला, विजय आखाडे, विजय मोरे, ओमकार फाटक यावेळी उपस्थित होते. शादान चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)