मैसूर पॅलेसमध्ये सर्वात मोठी योगा साखळी

मैसूर : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमीत्त सध्या सर्वत्र जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. कुठे योगशिबिर तर कुठे योग प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आले आहेत. त्यातच कर्नाटकमधील मैसूर पॅलेस येथे योगादिनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मैसूर पॅलेसमध्ये सर्वात मोठी योगा साखळी तयार करण्यात आली होती. गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या योगासाखळीची नोंद करण्यात यावी यासाठी ही साखळी तयार करण्यात आली होती. या साखळीमध्ये हजारो लोकांनी आपला सहभाग घेतला होता. योगचा प्रसार आणि प्रचार करण्यात यावा तसेच भारतीय योगाचे महत्व संपूर्ण जगाला कळावे याच हेतूने ही साखळी तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. (फोटो सौजन्य पीटीआय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)