मैदानी खेळाचे महत्त्व तरुणांनी समजून घ्यावे : ढाकणे

शेवगाव – “”कोणत्याही क्रीडा स्पर्धेत जय-पराजय मोठ्या मनाने खिल्लाडू वृत्तीतून स्वीकारला पाहिजे. भविष्याचा विचार करता तरुणांनी मैदानी खेळाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे,” असे प्रतिपादन केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी केले.
शेवगाव तालुक्‍यातील बोधेगाव येथे मोहटादेवी शुगर मिल्स व केदारेश्‍वर साखर कारखाना आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन अध्यक्ष प्रताप ढाकणे, अतुल दुगड यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 51 हजार रुपये, दुसरे बक्षीस 31 हजार, तर तिसरे बक्षीस 21 हजार, चौथे बक्षीस 11 हजार रुपये यासह मालिकावीर व करंडक 5 हजार रुपये आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या वेळी संचालक नीलेश चौधरी, अरुण कोदे, उपाध्यक्ष प्रकाश घनवट, श्रीकिसन पालवे, भाऊसाहेब पोटभरे, संदीप बोडखे, बाळासाहेब फुंदे, गहिनीनाथ सिरसाट, व्यवस्थापक सय्यद, शहाजी जाधव, नेमाणे, बाळासाहेब ढाकणे, बबनराव वाघुंबरे, अयुब शेख, पोपट केदार, क्रीडा प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांच्यासह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)