मैदानावरील माझा हिरो सचिनच-विराट कोहली

बंगळुरु : मैदानात माझा हिरो सचिनच असल्याचे भारतीय कर्णधार विराट कोहलीनं सांगितले. बंगळुरुमधील एका कार्यक्रमात तो बोलत होता. मी मैदानात असतो त्यावेळी माझा हिरो सचिनच आसतो. सचिनकडून मला प्रेरणा मिळते. असेही तो म्हणाला.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने काल एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, मैदानात तुझा हिरो कोण आहे? त्यावर त्याने सचिनचे नाव घेतले. पुढे बोलताना तो म्हणाला की, मैदानाबाहेर माझ्या अनेक व्यक्ती प्रेरणास्थान आहेत. ज्या व्याक्ती पैसे कमवण्यासोबतच चॅरटीमधून गरजू लोकांना मदत करतात अशा जगभारातील सर्व व्यक्तींचा मी आदर करतो. त्यांचा मा फॅन आहे. आपण कमावलेल्या बक्कळ पैशांमधून काही पैसा गरजू व्यक्तींच्या कामाला आला तर चांगले आहे.

आज बंगळुरुचा सामना पंजाबशी होणार आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ आज किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळेल. सलामीला आरसीबीला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहजपणे नमवून यंदाच्या सत्राची दिमाखात सुरुवात केली आहे. दरम्यान, या सामन्यात पंजाबचा विध्वंसक फलंदाज ख्रिस गेल आकर्षणाचे केंद्र असेल. पहिल्या सामन्यात गेलला खेळविले नसले, तरी या सामन्यात पंजाब त्याला नक्की खेळविण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)