मैदानांची नियमित देखभाल करण्याची मागणी

सातारा – सातारा शहरात खेळांसाठी मैदाने कमी असून जी आहेत, त्यातही धुळीचे साम्राज्य असल्याने व्यायाम करणाऱ्यांना श्‍वसनाचे त्रास होण्याची शक्‍यता आहे. खेळांसाठी मैदानाची नियमित देखभाल करण्याची मागणी क्रीडापटूंकडून होवू लागली आहे. शहरातील शाहू क्रीडा स्टेडियमवर मोठ्या संख्येने सकाळी व सायंकाळी नागरिक विविध खेळांसाठी येत असतात.

याठिकाणी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी महिला तसेच ज्येष्ठ नागरिक येत असतात. परंतु, मैदानावर पाणी मारले जात नसल्याने संपूर्ण मैदानात धुरळा उडत असतो. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे श्‍वसनाचे आजार होवू लागले आहेत. याठिकाणी प्रत्येक खेळासाठी अगदी चालण्यासाठीही शुल्क आकारले जात आहे. मग या पैशातून मैदानाची देखभाल का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबरोबरच जिल्हा परिषद, तालीम संघाचे मैदानावरही कमी-अधिक अशीच परिस्थिती आहे. तालीम संघाच्या मैदानावर वरचेवर क्रिकेट सामने होत असतात. त्यामुळे बऱ्यापैकी स्थिती आहे. परंतु, जिल्हा परिषद मैदानावर परिसरातील अबालवृद्ध जाण्यास कचरू लागले आहेत. शहरातील मैदानांची नियमित देखभाल प्रशासनाने करावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)