मैथिली गीतांनी रंगला फोगोत्सव

भोसरी ः मिथिला विकास मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार यांचा सत्कार करण्यात आला.
  • सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रम : मिथिला विकास मंचतर्फे भोसरी येथे आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – शिक्षण आणि रोजगारानिमित्त पिंपरी-चिंचवडसह पुण्यात मोठ्या प्रमाणात मैथिली भाषिक स्थायिक झाले आहेत. बिहार आणि झारखण्डमधून आलेल्या या मैथिली भाषिक बांधवांसाठी फागोत्सव मिलन समारोह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मैथिली भाषेसह विविध चित्रपट गीतांनी या कार्यक्रमात रंगत भरली. एकमेकांना गुलाल लावत गाण्यांवर ठेका धरत उपस्थितांनी या उत्सवाचा आनंद लुटला.

मिथिला विकास मंच, पुणे यांच्याद्वारे गेल्या तीन वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात नुकताच कार्यक्रम झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी पक्षनेता एकनाथ पवार, मिथिला विकास मंचाचे अध्यक्ष मिहिर झा, डीआरडीओचे वैज्ञानिक मृदकांत पाठक, पूर्वांचल विकास मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा, उपाध्यक्ष नेताजी सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

मैथिली गायक माधब राय, स्मृती मिश्रा ठाकूर, कंचन पांडे, शिखा झा, रामबाबू झा यांनी विविध गाणी सादर केली. या बहारदार गाण्यांवर मैथिली भाषक बांधवही थिरकले. बहुगुणी कलाकार रामसेवक ठाकूर यांनी मिमिक्री करून अनेक किस्से रंगवत सभागृहात हास्य फुलविले. मैथीली भाषक महिलाही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनीही एकमेकींना गुलाल लावत फोगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी www.maithilpune.com या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.

मैथिली बांधवांना रोजगाराच्या संधीबाबत या माध्यमातून मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार आहे. विवाहयोग्य वधू-वरांचा परिचय आणि त्यांचा विवाह घडवून आणण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होणार आहे.
मंचचे माजी अध्यक्ष डॉ. मनमोहन झा यांनी मार्गदर्शन केले. मंचचे कार्याध्यक्ष राकेश मिश्रा, उपाध्यक्ष बालकृष्ण मिश्रा, ललित ठाकूर, मनोजकुमार झा, सरोज झा, सचिव सुबोध झा, सुधेन्दू राय, कोषाध्यक्ष विभाष चंद्रा खां, सदस्य शंकर झा, मिहिर झा, रविंद्र झा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

परंपरा, संस्कृतीला चालणा देण्याची गरज
यावेळी एकनाथ पवार म्हणाले की, मिथिला प्रदेश म्हणजे सीतामातेची जन्मभूमी आहे. येथील मातीची पवित्रता आजही कायम आहे. मैथिली भाषा, परंपरा, मधुबनी पेंटींग आणि संस्कृतीला चालना देण्याची गरज आहे. मिथिला विकास मंच यासाठी कार्यरत आहे, ही कौतुकाची बाब आहे. तसेच, मंचचे अध्यक्ष मिहिर झा म्हणाले की, मिथिलेची परंपरा या मंचाच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंचाच्या माध्यमातून चार जोडप्यांना विवाहबध्द करण्यात आले आहे. गरीब आणि गरजूंना आर्थिक मदतही करण्यात येत आहे. यापुढेही मंचच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)